जलशुद्धीकरण केंद्रातील निष्काळजीपणामुळे नागरिकांची गैरसोय

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 7 एप्रिल 2018

कोंढवे धावडे - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोंढवे धावडे येथील जलशुद्धीकरण केंद्रातील निष्काळजीपणामुळे आज शनिवारी कोंढवे धावडे गाव व उत्तमनगर परिसराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. याबाबतची प्राथमिक माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. 

शुक्रवारी धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोचले. तेथे शुद्धीकरणाची प्रकिया पूर्ण देखील झाली. परंतु शुक्रवारी रात्री शुद्ध झालेले पाणी कोंढवे धावडे गावच्या टाकीत तसेच न्यू कोपरे येथील टाकीत सोडलेच नाही. सहा तासांनी वीज पंप बंद होतात. ते पहाटे चार वाजता पुन्हा सुरू केले जातात. त्यावेळी पाणी सोडले असता त्यातुन 12 मीटर पैकी तीन मीटरच (म्हणजे २५ टक्केच) पाणी टाकीत आले. या पाण्याला दाब न मिळाल्याने पाणी गावाला पुरवठा झालाच नाही. 

कोंढवे धावडे गावातील 85 टक्के गावाला पाणी पोचले नाही. ही बाब येथील कर्मचाऱ्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नाही. नागरिकांनी तक्रार केल्यावर अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराबाबत माहिती मिळाली.

हा निष्काळजीपणा कर्मचाऱ्यामुळे झाला की, यंत्रणेमुळे याबाबत अधिक चौकशी केली जाणार असल्याचे आता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ' बोलताना सांगितले.

Web Title: citizens have to suffer due to negligence in water purification center