दापोडीत मैलामिश्रित पाणी घरात येण्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

रमेश मोरे
शुक्रवार, 15 जून 2018

दापोडी येथील महात्मा फुले नगर भागातील नागरिकांच्या घरात गल्ली अंतर्गत रस्त्यावरील ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मैलामिश्रित पाणी घरात येण्यामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेहमीच्या या प्रकारामुळे लहान मुले, जेष्ठांना दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास सहन करावा लागत आहे.या परिसरातील ड्रेनेज लाईन वारंवार तुंबल्याने नागरीकांच्या स्वच्छतागृहातुन ओव्हरफ्लो होवुन घरात मैलामिश्रित पाणी येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

जुनी सांगवी - दापोडी येथील महात्मा फुले नगर भागातील नागरिकांच्या घरात गल्ली अंतर्गत रस्त्यावरील ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मैलामिश्रित पाणी घरात येण्यामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेहमीच्या या प्रकारामुळे लहान मुले, जेष्ठांना दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास सहन करावा लागत आहे.या परिसरातील ड्रेनेज लाईन वारंवार तुंबल्याने नागरीकांच्या स्वच्छतागृहातुन ओव्हरफ्लो होवुन घरात मैलामिश्रित पाणी येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

येथील रहिवाशी जमा डेव्हिड, अंजु कांबळे, शिला सुर्यवंशी, सत्यभामा गायकवाड, सोनाली कांबळे, दिनकर सपकाळ, कांता सुर्यवंशी, रंजना शिंदे, राजू कांबळे, सखूबाई कांबळे, सुनिता गायकवाड, कमल कांबळे, शीला सुर्यवंशी, सुकुमार बनसोडे, कबीर कांबळे, मधुकर करणे, चंदरिका कांबळे, रीना रोकडे या रहिवाशांच्या घरात मैलामिश्रित पाणी येत असल्याचे नागरीकांनी सकाळशी बोलताना सांगीतले. यामुळे, लहान मुले आजारी पडत आहेत. अबाल वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नागरीकांनी सांगीतले.

यावेळी, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक रोहित काटे,  माई काटे, नगरसेवक राजू बनसोडे, रवि कांबळे, सिकंदर सुर्यवंशी यांनी भागाची पाहणी केली.

 

Web Title: Citizen's health issue in pcmc