जुन्नरला जनावरांच्या अनधिकृत कत्तलीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दत्ता म्हसकर
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

जुन्नर - जुन्नरला जनावरांच्या अनधिकृत कत्तलीमुळे येथील पणसुंबा पेठेतील नाला व गटारीतुन रक्त आणि मांसमिश्रित दुर्गंधी युक्त पाणी सकाळ-सांयकाळ मोठ्या प्रमाणात वहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

यामुळे या परिसरात दोन्ही बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत दिवसभर मोठी दुर्गंधी पसरलेली असते संध्याकाळ नंतर दुर्गंधीचे प्रमाणात प्रचंड वाढ होते परिसरातील नागरिकांना श्वासोच्छ्वास करणे देखील कठीण होत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

याबाबती संबंधित सरकारी किंवा प्रशासकीय विभागाने लक्ष देउन रक्त व मांस मिश्रीत दुर्गंधी युक्त पाण्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी उपसभापती उदय भोपे व परीसरातील नागरिकांनी केली आहे.यापुर्वी मार्च महिन्यात जुन्नर नगर पालीका व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले. रविवारी ता.11 रोजी पहाटे पासून दुपारपर्यंत दुर्गंधी येत होती असेही त्यांनी सांगितले. जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना कळविले असता त्यांनी याबाबत पोलिसांकडे अनधिकृत कत्तल होत असल्याने ते मांस व रक्त नाल्यात सोडले जात असल्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी असे सांगितले असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील परिसरातील नागरिकांनी  आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

यापूर्वी जुंन्नर पोलिसांकडून अनेकदा याबाबत धाडी टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून याकडे पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची नागरीकांची तक्रार आहे.

Web Title: Citizens' health risks due to unauthorized slaughter of animals