तांब्याभर पाण्यासाठी तरसतोय, लोहगावकरांची संतप्त भावना

agitation
agitation

वडगाव शेरी (पुणे) : दहा ते पंधरा दिवसातून अर्धा तास पाणी येते. तांब्याभर पाण्यासाठी तरसतोय साहेब... पाणी पाजणे पुण्य आहे, परंतु कोणी तांब्याभर पाणी मागितले तर अंगावर काटा येतो, स्वतःची लाज वाटते, अशी उद्वीग्न भावना लोहगावच्या ग्रामस्थांनी पालिका आयुक्तांसमोर व्यक्त केल्या. पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली लोहगाव, खराडीच्या नागरिकांनी पुणे महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.  

माजी आमदार बापु पठारे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अॅड. भैयासाहेब जाधव, राष्ट्रवादीचे विभागाध्यक्ष राजेंद्र खांदवे, रमेश आढाव, सोमनाथ साबऴे, अशोक खांदवे, बंडू खांदवे, लोहगाव ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.     

बापु पठारे म्हणाले, पूर्व भागाला सध्या पाणी टंचाई आहे. त्यातील लोहगाव आणि खांदवेनगर भागातील पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. येथे बारा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळते. पाणी टंचाईविरोधात या आठवड्यातील हे दुसरे आंदोलन आहे.

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादीने आंदोनल मागे घेतले. आंदोलन कर्त्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांचीही भेट घेऊन पाणी टंचाईविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.     

खांदवेनगरला खराडीच्या वाहिनीतून आणि विद्यानगरच्या पंपिंग स्टेशनवर जास्त क्षमतेचा पंप बसवून लोहगावला दिवसाआड पाणी देता येईल. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनशुन्य कारभारामुळे निर्माण झालेली कृत्रीम टंचाई टाळता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com