पुणे - पालिकेच्या हलगर्जीपणाची शिक्षा मांजरीकरांना

कृष्णकांत कोबल
सोमवार, 7 मे 2018

मांजरी (पुणे) : महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे मांजरीकरांना दुषित पाण्याशी सामना करावा लागत आहे. लक्ष्मी कॉलनी जवळील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना   पालिका हद्दीतून येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याने वेढले असून त्यांचे स्रोत दुषित झाले आहेत. गेली अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

लक्ष्मी कॉलनी जवळून वाहणाऱ्या जुन्या नव्या कालव्यांदरम्यान मांजरी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीच्या पुनर्भरणासाठी नव्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्याचा उपयोग होत आहे. हे पाणी विहिरीच्या चोहोबाजूंनी साचलेले आहे. मात्र, काही दिवसांपासून याच पाण्यात गोंधळेनगर, गंगानगर भागातून येणारे पाणी मिसळत आहे. त्यामुळे विहिरीचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका वाढला आहे. 

गोंधळेनगरकडून येणारी ड्रेनेजलाईन नवा कालवा ओलांडून येथील दोन विहिरींच्या मधून पुन्हा जुना कालवा ओलांडून लक्ष्मीकाँलनी मार्गे पुढे जाते. याठिकाणी अरूंद वाहिनी असल्याने मागील बाजूला वाहिनीवर दाब येऊन चेंबरवाटे मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी बाहेर पडत आहे. हे पाणी विहिरीजवळील पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. पालिकेला तक्रार करूनही तात्पुरत्या डागडुजी शिवाय त्याबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. तेथे वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत आहे, मात्र हलगर्जीपणा मुळे ठोस काम होताना दिसत नाही. महादेवनगर, मांजरीच्या नागरिकांनी पालिकेच्या अशा पध्दतीने होत असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हद्दी शेजारील गाव म्हणून शुध्द पाणी पुरवायचे सोडून आहे ते पाणी दुषित करण्याचा अधिकार पालिकेला कोणी दिला ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

"येथील प्रश्नाबाबत पालिकेच्या मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याबाबत ग्रामपंचायतने पत्रव्यवहारही केला आहे.''
- शिवराज घुले, सरपंच, मांजरी बुद्रुक

"विहिरीच्या बाजूने पाट काढून ड्रेनेजचे पाणी काढून दिले आहे. त्याचबरोबर दुरुस्तीचे कामही सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या पूर्णपणे सुटेल.''

- रावसाहेब खंडागळे, कनिष्ठ अभियंता, मलनिस्सारण

Web Title: citizens of manjari face dirty water problem due to mnc