मांजरीकरांनी जपली संवेनशीलता

कृष्णकांत कोबल
शनिवार, 28 एप्रिल 2018

मांजरी खुर्द (पुणे) : आगोदरच बेताची परिस्थिती आणि त्यातच पित्याचे छत्र हरविले. आता त्यांच्या चिमुकल्यांच्या भविष्याचे काय.. पत्नी आणि वृध्द आई-वडील संसाराचा गाडा कसा ओढणार अशी हळ-हळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत होती. त्यांच्या या घालमेलीचे रूपांतर वेदनेत झाले. या कुटुंबाच्या आपलेपणापोटी दशक्रियेच्या दिवशी एक-एक करीत दातृत्वाचे अनेक हात पुढे येत गेले. या हातांनी तब्बल सुमारे तीन लाख रूपयांचा मदत निधी जमा करीत आजूनही संवेनशीलता संपली नसल्याचे दाखवून दिले. 

येथील सचिन पंडीत उंद्रे (वय ३६) यांचे नुकतेच अकाली निधन झाले. वृध्द आई-वडील, पत्नी, चार वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी यांचा आधारच नाहीसा झाला. उंद्रे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते.  छोट्याशा राहत्या घराशिवाय कोणतीही संपत्तिक स्थिती नाही. आईवडील चरितार्थ चालविण्यासाठी गेली काही वर्षांपासून पंढरपूर येथील गावच्या धर्मशाळेत सेवा व देखभालीचे काम करीत आहेत. 

दशक्रियेवेळी चर्चा आणि हळहळ प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर पडत होती. 
कार्यक्रम सुरू असताना येथील चिंतामणी मित्र मंडळाने या कुटुंबातील दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. माजी उपसरपंच किशोर उंद्रे व कार्यकर्ते जीवन उंद्रे यांनीही मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचे जाहीर केले.

दशक्रियेसाठी जमलेल्या अनेकांचे मदतीचे  हात वर होऊ लागले. अशोक आव्हाळे यांनी  रूग्णालयाचा पाच हजार रपयांचा खर्च न घेण्याचे ठरविले. तर बापुसाहेब पवार यांनी दशक्रियेच्या अन्नदानाचे पाच व रोख पाच अशी दहा हजार रुपयांची मदत दिली. अनिल इनामदार या भटजींनीही कोणतेही मानधन न घेता मोफत विधी करून दिला.

स्वामी समर्थ प्रतिष्ठान व बाळासाहेब उंद्रे यांनी २५ हजार रुपये तर रोहिदास उंद्रे, सिताराम उंद्रे, चिंतामणी व शिवक्रांती  मित्र मंडळ यांनी प्रत्येकी ११ हजार तर सतरा जणांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. उपस्थितांपैकी अनेकांनी दोनशे पासून तीन हजार रुपयांची मदत यावेळी केली.  

या कुटुंबाच्या मदतीसाठी जमा झालेली ही सुमारे तीन लाख रुपयांची रक्कम मयत सचिन उंद्रे यांच्या मुलांच्या नावे दीर्घ मुदतीवर ठेवण्यात येणार आहे. 

Web Title: citizens of manjari shows sensibility