Vidhan Sabha 2019 : पर्वती कन्येला आमदार करायचंय; मतदारांनी केला निर्धार

Vidhan Sabha 2019 : पर्वती कन्येला आमदार करायचंय; मतदारांनी केला निर्धार

सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रभागांमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरोघरी औक्षण करून महाआघाडीचे उमेदवार अश्विनी नितीन कदम यांचे उत्स्फूर्त स्वागत करून 'आता आमचं ठरलंय, पर्वती कन्येला आमदार करायचं' असा विश्वास मतदारांनी प्रचार दौऱ्यामध्ये दिला.

उच्चशिक्षित शिक्षिका असलेल्या पर्वतीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी प्रभाग क्रमांक 35 , सहकारनगर - पद्मावती भागातील दाते बस स्टॉप शिंदे हायस्कूल परिसर , किरण सोसायटी , सुवर्ण सोसायटी , तळजाई  वसाहत परिसर , भिकाजी बापू भोसले समाजमंदिर मागील परिसर , ओम मित्र मंडळ , म्हसोबा मंदिर रोड,लुंकड शाळा, वनशिव वस्ती,हनुमंत धडे , स्क्रॅप दुकान , खंडाळे चौक,महात्मा गांधी सोसायटी,लक्ष्मी मंदिर परिसर, नगरसेवक सुभाष जगताप यांचे निवासस्थान परिसर आदी भागातून प्रचारफेरी काढून नागरिकांशी संवाद साधला.

घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. मतदारांनी कदम यांची रांगोळ्यांच्या पायघड्या घालून उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी अश्विनी कदम यांनी मतदारांशी संवाद साधताना तुम्ही विकासासाठी एक पाऊल पुढे या, मी तुमच्यासाठी आणि पर्वती मतदारसंघाच्या विकासासाठी दहा पाउले पुढे येण्यास सदैव तयार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com