दगड, माती, मुरूम वाहून गेल्याने मोरमारेवाडीकरांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पावसाच्या पहिल्या महिन्यात दगड, माती, मुरूम वाहून खाली येऊ लागल्याने या रस्त्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडी करांचा जीव टांगणीला लागला आहे. गावकरी रात्रंदिवस भीतीच्या दडपणाखाली वावरत आहे. प्रशासनाला याबाबत अजून गांभीर्य दिसून येत नाही. 
 

टाकवे बुद्रुक - मोरमारवाडी, डोंगरवाडी, हेमाडेवस्ती, सटवाईवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड आले आहे. रस्त्याच्या कडेला भेगा पडल्या असून त्या लगतचा मुरूम मातीचे खराळ वाहू लागले आहे. पावसाच्या पहिल्या महिन्यात दगड, माती, मुरूम वाहून खाली येऊ लागल्याने या रस्त्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडी करांचा जीव टांगणीला लागला आहे. गावकरी रात्रंदिवस भीतीच्या दडपणाखाली वावरत आहे. प्रशासनाला याबाबत अजून गांभीर्य दिसून येत नाही. 

या गावच्या भीतीची व्यथा 'सकाळ'ने जुन महिन्यात "भीती माळीणीची'या मथळ्याखाली व्यथा मांडली होती. पण प्रशासनाने याकडे डोकावून पाहिले नाही. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात काही प्रमाणात मुरूम मातीचे खराळ कोसळले होते, तत्पूर्वीच गावकऱ्यांनी भीती व्यक्त केली होती. पण आता तर रस्त्यावर मोठमोठे दगड पडले आहेत, मुरूम मातीचा खराळ डोंगराच्या उतारावरून पडू लागले तर रस्ता खोदताना बाजूला काढलेल्या गटारांच्या बाहेरील भरावाच्या बाजूला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. या भेगात पावसाचे पाणी सतत मुरत राहिले तर माळीणीची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भीती गावकरी करीत आहे.   

takve budruk

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ६.५ किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी शासनाने ४ कोटी ४७ लक्ष निधी मंजूर केला आहे, वास्तविक जून २०१४ला या रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम मागील वर्षी सुरू झाले.महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याचा उपयोग सह्याद्रीच्या कडेपठारावर दुर्गम भागातील जनतेला होणार आहे. पण हा रस्ता मोरमोरवाडी गावाच्या वरच्या अंगाने गेला आहे. निसर्गाच्या रौद्र रूपात काही घडू शकते, त्यात मोरमोरवाडी, माऊ, वडेश्वर, गभालेवाडी, कुसवली ही गावे डोंगरमाथ्याला असल्याने ती पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यात मोरमोरवाडीला खराळ कोसळून अधिक धोका वाढतो आहे. याची भीती गणेश मोरमारे, सोमनाथ मोरमारे, दिपक मोरमारे, संतोष मोरमारे आदी गावकऱ्यांनी केली आहे. 

तहसीलदार रणजित देसाई म्हणाले, "या स्थितीचा पंचनामा केला असून सुरक्षिततेचे उपाय योजनेसाठी सबंधितांना आदेश दिले आहे. मागील वर्षी देखील धोक्याची सूचना दिली होती. खराळ कोसळणे, दगडी बाजूला करणे आदि सुरक्षितता राखणे साठी आदेशाची अंमलबजावणी तातडीने केली जाईल.'' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: citizens problem facing because of heavy rain at takve budruk pune