पुणे - महापौरांशी साधला नागरीकांनी संवाद

बाबा तारे
शनिवार, 12 मे 2018

औंध (पुणे) : "महापौर आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्र.०८ औंध-बोपोडी व प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-पाषाण येथील नागरीकांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी बालेवाडी येथील कंफर्ट झोन सोसायटीमध्ये  महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. यावेळी परिसरातील नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या तसेच विकास कामांमध्ये आपल्या सूचना मांडल्या.

यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी नागरीकांशी थेट संवाद साधुन त्यांच्या समस्यांचे निरसन केले तसेच संबंधित विविध खात्यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश दिले. तसेच महापालिकेच्या नविन धोरणांविषयी व योजनांबद्दल नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरीकांनी मात्र समस्येचा पाढाच महापौरांच्या समोर वाचला. स्मार्ट सिटी असूनही या भागातील प्राथमिक सुविधांची आजपर्यंत पूर्तता झाली नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या.

पाणी, रस्ता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहिन्या, रामनदीतील राडारोडा, उद्यानातील समस्या यासंदर्भात जास्त तक्रारी समोर आल्या. या सर्व समस्या वर्षानुवर्षे तशाच असल्याने या सर्वांवर आम्हाला तातडीने उपाययोजना हवी अशी एकमुखी मागणी सर्व नागरीकांनी केली. बाणेर पाषाण लिंक रस्ता समिती अध्यक्ष राजेंद्र चतुर, उमर शेख, संजय खंडाळे, उमा गाडगिळ, अभय बागल यांनील परिसरातील समस्या मांडल्या. यावेळी नगरसेवक तथा औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका सुनिता वाडेकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका अर्चना मुसळे, सहायक आयुक्त संदिप कदम, सहायक उपायुक्त जगदिश जाधव, मुख्य विभाग तथा औंध क्षेत्रिय कार्यालय येथील सर्व खात्यांचे अधिकारी व कर्मचारी आणि प्रभागातील नागरीक उपस्थित होते. 

Web Title: citizens of pune discussion with mayor mukta tilak