नगररचना योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद

PMRDA
PMRDA

पुणे - नागरिकांच्या सहभागातून नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतलेल्या निर्णयाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. किमान शंभर एकरांच्या वरील क्षेत्र असलेल्या नागरिकांनी एकत्र येत टीपी स्कीम राबविण्यासाठी १० प्रस्ताव पीएमआरडीएकडे प्राप्त झाले आहेत. 

सध्याच्या कार्यपद्धतीनुसार पीएमआरडीएकडून नगर रचना योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला जातो. जागा निश्‍चिती, भूसंपादन करण्यापासूनची सर्व प्रक्रिया पीएमआरडीएकडून केली जाते. अनेकदा त्याला विरोध होतो. पारदर्शकपणे ही योजना राबविली जात आहे की नाही, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाते. त्यातून वाद निर्माण होतात आणि अनेकदा योजना पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागतो. हे ओळखून पीएमआरडीएने अशा नगर रचना योजना राबविण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा. भूसंपादनासाठी वेळ लागणार नाही. आणि योजनाही  पारदर्शकपणे मार्गी लागण्यास मदत होईल, या हेतूने ही योजना सुरू केली आहे. नागरिकांनी एकत्रित येऊन  ही योजना राबविण्यासाठी विनंती केल्यास ती टीपी स्कीम राबविणार असल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले होते. त्यानुसार पीएमआरडीएकडे १० प्रस्ताव आले आहेत. या टीपी स्कीमचे एकूण क्षेत्र हे सुमारे १ हजार एकर असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com