भयंकर! नागरिकांवर आली शौचालयाबाहेर पाणी भरण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्यावतीने गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, बुधवारी दुपारपासूनच पाणी बंद झाल्याने रहिवाशांना पाणी साठवता आले नाही. यावेळी मात्र सुलभ शौचालयाच्या परिसरात असलेल्या बोअरिंगचे पाणी सुरु असल्याने पहाटे पाच वाजल्यापासूनच महिलांनी पाणी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. काहीजण बर्फाचा कारखान्यावर तर, काही जणांनी धोबीघाट कॅनॉलवर धाव घेतली होती.

पुणे : पुणे शहरात पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात आल्याने संपूर्ण पुणे शहरात (गुरुवारी) आज पाणी बंदमुळे  महिलांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागली. साधे पिण्याचे पाणी ही घरात नसल्याने 'कुणी पाणी देता का पाणी' अशी हाक भवानी पेठ कासेवाडी येथील रहिवाशांनी शेजारपाजाऱ्यांचे दार ठोठावत मागणी केली.

दापोडीतील शाळा परिसरात पोलिसांची रोडरोमियोंवर धडक कारवाई

महापालिकेच्यावतीने गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, बुधवारी दुपारपासूनच पाणी बंद झाल्याने रहिवाशांना पाणी साठवता आले नाही. यावेळी मात्र सुलभ शौचालयाच्या परिसरात असलेल्या बोअरिंगचे पाणी सुरु असल्याने पहाटे पाच वाजल्यापासूनच महिलांनी पाणी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. काहीजण बर्फाचा कारखान्यावर तर, काही जणांनी धोबीघाट कॅनॉलवर धाव घेतली होती. पाणी नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुट्ट्या घ्यावा लागल्या तर, काही जणांना कामावरही जाता आले नाही.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

''कालच पाणी बंद असणार हे माहित झाले होते. मात्र बुधवारी पाणीच आले नसल्याने कुठलेच काम करता आले नाही. त्यामुळे साधं पिण्यासाठीही घरात पाणी नाही. आज मुलाला शाळेला सुट्टी द्यावी लागली. व पतीही कामावर जाऊ शकले नाही.''
- मनीषा पवार

पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens taking water from front of public toilets in Pune