पूरग्रस्त टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार 

citizens from Tangewala colony boycotts voting in Pune
citizens from Tangewala colony boycotts voting in Pune

पुणे : गेल्या महिन्यात आंबील ओढयाला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आणि सात जणांचा बळी गेलेल्या टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

एकही उमेदवार प्रचारासाठी अगर मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून मदत न मिळाल्याने मतदान न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून मिलेलेली मदत तुटपुंजी आहे. याकडे प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही नागरिक या निर्णयावर ठाम असल्याचे दिसुन आले. प्रशासन आणि सर्वपक्षीय उमेदवारांबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

याठिकाणी एकूण 80 ते 85 घरे असून 400 च्या आसपास मतदार आहेत. आमची आणि आमच्या मताची किंमत तुम्हाला नसेल तर आम्हालाही तुम्हाला मतदान करायचे नाही असे खडे बोल नागरिक ऐकवीत आहेत. उमेदवारांनी तर प्रचारादरम्यान या भागात येणे टाळले. त्यांनी बाहेरून बाहेरूनच पळ लढल्याचा आरोप शेरु शेख, संजय शिंदे, नंदा शिंदे, अजीज शेख, चंदन भोंडेकर, कैलाश शिंदे, शैलेश चव्हाण, महंमद किरसुल, रेहाना शेख यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com