ऐन दिवाळीत नागरिकांनी अनुभवला थरार 

download.jpg
download.jpg

वडगाव शेरी(पुणे) :  पूर्व पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टिंगरेनगर-विद्यानागर पंपिंग स्टेशन येथली रोहित्राजवळ शॉर्टसर्किट झाल्याने खांबावरील विद्युत वाहिणीला आग लागली. ऐन दिवाळीत जशी फटाक्यांची आतषबाजी होते तसे कानठळ्या बसणारे आवाज आणि आगीचे लोट परिसरात उडत होते. हा थरार सात मिनिटे सुरू होता, अशी माहिती पंपिंग स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी दिली.

हा थरार पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. हा प्रकार सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. वीज गेल्याने विद्यानागर पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रात्री एक वाजता वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी केला. परंतू पाण्याच्या टाक्या पूर्ण न भरल्याने  काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com