लोन ॲपवरून कर्ज घेतलेल्या नागरिकांना बेकायदा वसुलीसाठी दमदाटी आणि शिवीगाळ

‘लोन ॲपवरून घेतलेल्या पाच-दहा हजार रुपये कर्जाच्या बदल्यात तिप्पट, चौपट रुपये घेतले गेले. त्यानंतरही आम्हाला धमक्‍या दिल्या जातात.
Loan App
Loan AppSakal
Summary

‘लोन ॲपवरून घेतलेल्या पाच-दहा हजार रुपये कर्जाच्या बदल्यात तिप्पट, चौपट रुपये घेतले गेले. त्यानंतरही आम्हाला धमक्‍या दिल्या जातात.

पुणे - ‘लोन ॲपवरून घेतलेल्या पाच-दहा हजार रुपये कर्जाच्या बदल्यात आमच्याकडून तिप्पट, चौपट रुपये घेतले गेले. त्यानंतरही आम्हाला धमक्‍या दिल्या जातात. पोलिसात तक्रार करूनही कारवाई होत नाही, आम्ही तणावात जगत आहोत,’ अशा शब्दांत लोन ॲपवरून कर्ज घेतलेल्या नागरिकांनी कैफियत मांडली आहे.

मोबाईल लोन ॲपवरून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून नागरिकांवर दादागिरी केली जात असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर अनेक नागरिकांना याच स्वरूपाचे अनुभव येत आहेत.

मी लोन ॲपवरून ९ हजार रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात ३६ हजार रुपये भरले आहेत. त्यासाठीही दुसरे कर्ज घेण्याची वेळ माझ्यावर आली. अजूनही ते पैसे मागत आहेत. पोलिसांकडे तक्रार केली आहे, मात्र त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई नाही.

- दिव्यांग नागरिक

एका लोन ॲपकडून कर्ज घेतल्याचे सांगून माझ्याकडे नऊ हजार रुपयांची मागणी केली जात आहे, त्यासाठी मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात आहे. जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पोलिस आमची दखल घेत नाहीत.

- तसनीम शेख

मोबाईल ॲपद्वारे व्हाॅटसअॅपवर खूप लिंक आपोआप खुल्या होतात. त्यामधून अनेकांचे पैसे गेले आहेत. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला दीडपट, दुप्पट व्याज देतो असे सांगून चार ते पाच लाख रुपये घेतले. आता त्याचे पैसे देत नाहीत. तो तणावाखाली आहे.

- एक नागरिक, सिंहगड रस्ता

टिंगरेनगर येथील एका व्यक्तीने मोबाईल लोन ॲपद्वारे पाच हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्याने १५ हजार भरले. तरीही त्याला आणखी पैशांसाठी तगादा लावून धमक्‍या दिल्या जात आहेत. आता संबंधित व्यक्तीच्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील व्यक्तींना फोन करून त्यांची बदनामी केली जात आहे. हा प्रकार अनेकांबाबत घडत आहे. कमी व्याज, तत्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून असे प्रकार केले जात आहेत.

- दिलीप डाळीमकर, धानोरी

तो मुझसे बुरा कोई नही होगा ! -

आमच्याकडे लोनच्या भरपूर ऑफर आहेत, ३० हजार रुपयांचे लोन अवघ्या पाच मिनिटांत करून देतो, आमची लोन सेवा देणारी विविध ॲप्लिकेशनही आहेत. जर तुम्ही माझ्या मोबाईल कॉल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष केले, तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, अशा पद्धतीचे मेसेज नागरिकांना येत आहेत. त्यांना प्रतिसाद न दिल्यास शिवीगाळ करून धमकी दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com