शहर शेती आपल्याला संस्कृतीशी जोडणारी आहे - रविंद्र धारीया

बाबा तारे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औंध (पुणे) : "शहरातील शेतीकाम हे ताणतणाव घालवणारे आणि उत्साह वाढविणारे आहे. त्याचबरोबर शहर शेतीमुळे माती-पाण्यासह कृषी परिसंस्था आणि संस्कृतीसोबत पुन्हा एकदा आपली नाळ जोडली जाणार आहे. शहर शेती ही संकल्पना श्रमसंस्कार, स्वावलंबन, निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे देणारी तसेच सुरक्षित विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन प्रदान करणारी आहे" असे प्रतिपादन वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांनी केले.

बाणेर येथील संत तुकाराम गड येथे अन्नदाता, वसुंधरा स्वच्छता अभियान वनराई यांच्यावतीने  विषमुक्त - नैसर्गिक धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना धारीया म्हणाले "शहर शेती संकल्पना ही शेतकऱ्यांचे कष्ट, चिकाटी आणि संयम याबद्दल जाणीव करून देणारी आणि एकूणच शेतीच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी आहे. तसेच शहर शेती या अंकाच्या माध्यमातून शहरवासीयांमध्ये शहर शेती विषयी जागरुकताही निर्माण होईल".

शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळीमुळे  मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवण्याच्या दिशेने सुरुवात करण्याचा यावेळी निर्धार केला. शहरात कशा प्रकारे शेती करता येईल यावर मार्गदर्शन करुन तज्ज्ञांनी माहिती दिली.तसेच आज वाढत असलेले प्रदुषण यावर आधारीत कचरा,सांडपाणी , सुरक्षित-विषमुक्त अन्न पिकवूया या विषयावरील वनराई विशेषांकाचे प्रकाशनही पाणी पंचायतच्या संस्थापिका कल्पना साळुंखे आणि रविंद्र धारिया (अध्यक्ष, वनराई) यांच्या हस्ते करण्यात आले.

कमीत कमी कचरा निर्माण करून अधिकाधिक कचरा घरी जिरविण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात अशा अनेक गोष्टीचे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.यावेळी संतसेवक मारुती कोकाटे,गुलाबराव तापकिर अन्नदाता चळवळीचे श्रीनिवास खेर, आशुतोष प्रधान, भूषण पाटील आणि सदानंद पेंडसे,वसुंधरा अभियानचे अनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city farming connecting to our culture said by ravindra dhariya