शहरात थंडी जाणवू लागली 

शहरात थंडी जाणवू लागली 

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुण्यातील गारठा वाढला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे आणि नगरमध्ये नोंदले गेले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. 

शहरात 31.6 अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.6 अंश सेल्सिअसने कमी होऊन 13.8 अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. पुणे शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये आकाश निरभ्र राहील. पण किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

उत्तरेकडील थंड हवेचे प्रवाह वाढले असून, दुपारच्या वेळीही गार वारे वाहत असल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. नाशिकसह नगर, पुण्यात तापमान गारठा वाढला आहे. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्याच्या दक्षिण भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता. 3) आणि रविवारी (ता. 4) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com