शहरात रस्त्यांची ‘वाट’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

पुणे - पावसाळ्याआधी रस्ते आणि पदपथांची डागडुजी केल्याचा दावा महापालिकेने केला असला, तरी जेमतेम पावसातच वर्दळीसह गल्लीबोळातील रस्ते उखडले आहेत. वाहनांची वर्दळ असलेल्या स्वारगेटसह शिवाजीनगर, कर्वे रस्ता आणि विश्रांतवाडीतील रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याचे आढळून आले आहे. रस्त्यांवर खडी आणि डांबर टाकून दुरुस्तीचा केवळ देखावा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे पडले असून, या कामावरील लाखो रुपयांचा खर्च ‘पाण्यात’ गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यानुसार यंदाही ती झाली. 

त्यात नव्याने केलेल्या काही रस्त्यांवरही खड्डे पडल्याने संबंधित ठेकेदारांनी ते बुजविल्याचे महापालिकेने स्पष्ट केले; परंतु ही डागडुजी नावापुरतीच झाली. ती होऊन पंधरा दिवसही झाले नसतानाच त्यावरील खडी आणि डांबर वाहून गेल्याचे आढळून आले. 

स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी), तर काही रस्त्यांची कामे महापालिका करते. या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथील रस्ते वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतात. दोन्ही यंत्रणा एकत्र कामे करीत असल्याचे दाखविले जाते; पण त्याचा दर्जा राखला जात नसल्याने महिनाभरात पुन्हा खड्डे दिसू लागतात. धानोरी-कळस रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमी पाणी साचते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ती करीत असताना त्यावर 
खड्डे पडणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र, ज्या भागात खड्डे आहेत, ती कामे लगेचच हाती घेतली आहेत. त्यानुसार दुरुस्ती 
झाली आहे. नव्या रस्त्यांबाबत तक्रारी असतील तर ठेकेदारांकडून कामे करून घेण्यात येतील. 
- अनिरुद्ध पावसकर, प्रभारी प्रमुख, पथ विभाग, महापालिका

सहा महिन्यांत डागडुगी झालेल्या रस्त्यांची लांबी ७० किलोमीटर
या कामांवरील खर्च २५ कोटी 

Web Title: city road hole