शहरात नळजोड किती?

ज्ञानेश सावंत
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...! इतक्‍या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या पुण्यात नळजोड किती असावीत, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिका दोन वेगवेगळ्या आकड्यांत देते. पहिला आकडा १ लाख ६० हजार, तर दुसरा आकडा ३ लाख ४५ हजार...!  मात्र, नळजोडांचा निश्‍चित आकडा किती असावा, याबाबत ठोस आकडेवारी महापालिकेकडे सध्या तरी उपलब्ध नाही.

नळजोडांच्या आकडेवारीची गोळा बेरीज महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, नेमके किती नळजोड अधिकृत आणि किती अनधिकृत? याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे निम्म्या शहरात बेकायदा नळजोड असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

या संदर्भात नगरसेवक विशाल तांबे यांनी प्रश्‍न विचारला होता.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत शहराचा विस्तार व नागरीकरण वाढले असतानाही २०१४ पर्यंत जेमतेम ३४ हजार इतके नळजोड असल्याचे उत्तर महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; तेव्हा ही संख्या म्हणजे महापालिकेच्या सभागृहाची फसवणूक करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरातील लोकसंख्येला करण्यात येणारा पाणीपुरवठा यावरून सध्या महापालिका आणि पाटबंधारे खाते यांच्यात वाद सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडील लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला रोज ६९२ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे पाणीकपात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नळजोडणीची माहिती घेतली असता, भलतीच उत्तरे मिळाली. दुसरीकडे समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यातही सुमारे साडेतीन लाख मीटर खरेदीची प्रक्रिया होणार आहे, याचा अर्थ शहरात तीन लाखांहून अधिक नळजोड असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: City Water Connection