दोन वर्षांत शहराला चोवीस तास पाणीपुरवठा

मिलिंद वैद्य
शनिवार, 10 डिसेंबर 2016

240 कोटींच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी
पिंपरी - गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाईशी सामना कराव्या लागणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक दिलासा देणारे वृत्त आहे. राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत शहराच्या महत्त्वाकांक्षी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला नुकतीच मंजुरी दिली आहे.

त्यासाठी 240 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 209 कोटींची निविदा महापालिकेने काढली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत संपूर्ण शहराला आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा उर्वरित 60 टक्के शहराचा दुसरा टप्पा अमृत योजनेअंतर्गत समाविष्ट केलेला आहे. त्यासाठी 240 कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने नुकतीच अंतिम मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर पालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्याच्या 209 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली असून, 23 डिसेंबरला ती उघडण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने काम सुरू केले जाणार आहे.

सध्या केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून शहराच्या 40 टक्के भागाला 24 तास पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून, उर्वरित 60 टक्के भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 239 कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने नुकतीच अंतिम मंजुरी दिली आहे.

महापालिकेने केंद्राकडे "अमृत'मधून 270 कोटींची मागणी केली होती. त्यामध्ये राज्य सरकार व महापालिकेलाही खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारचा हिस्सा 33.33 टक्के, राज्य सरकारचा 16.67 टक्के आणि स्वतः महापालिकेचा हिस्सा 50 टक्के इतका आहे. मात्र, 240 कोटींचा हा प्रकल्प मंजूर झाल्याने पालिकेच्या या कामाला आणखी गती मिळाली आहे. या योजनेत यंत्रणेच्या देखभालीचा व ग्राहकांना पाणी मीटर देण्याच्या खर्चाचा अंतर्भाव नाही. त्यामुळे महापालिकेला त्याची वेगळी तरतूद करावी लागणार आहे.

असा असेल प्रकल्प

  • * शहराच्या उर्वरित 60 टक्के भागाला 24 तास पाणीपुरवठा
  • * हायड्रॉलिक मॉडेलिंगद्वारे आवश्‍यक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलणार
  • * 74 हजार नळजोडही बदलणार
  • * वीस लाख लिटर क्षमतेच्या सात टाक्‍या उभारणार
  • * पाच लाख लिटर क्षमतेचे दोन भूमिगत हौद बांधणार
  • * समान वितरणासाठी "डीएमए फॉर्मेशन' यंत्रणा तयार करणार

'चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या पहिला टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. सरकारने दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिल्याने हे काम तातडीने होईल. दोन वर्षांत संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने व क्षमतेने पाणी मिळेल. प्रत्येक नळजोडाकरिता मीटर पुरविण्यात येणार आहेत. त्याची वेगळी आर्थिक तरतूद पालिकेला करावी लागेल.''
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, महापालिका

Web Title: City water supply round the clock for two years