'बॅंकिंग गैरव्यवहारांच्या आकड्यांमध्ये विपर्यास'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१८-१९ वर्षात झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या रकमेपैकी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे प्रमाण ९० टक्‍के असून, सहकारी बॅंकांचे प्रमाण केवळ ०.२१ टक्‍के आहे. त्यामुळे नागरी बॅंकिंग क्षेत्रातील घोटाळा हा आकड्यांचा विपर्यास असल्याची माहिती महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

पुणे - रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१८-१९ वर्षात झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या रकमेपैकी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे प्रमाण ९० टक्‍के असून, सहकारी बॅंकांचे प्रमाण केवळ ०.२१ टक्‍के आहे. त्यामुळे नागरी बॅंकिंग क्षेत्रातील घोटाळा हा आकड्यांचा विपर्यास असल्याची माहिती महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिझर्व्ह बॅंकेचा हवाला देत देशातील नागरी बॅंकिंग क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षांत २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात फेडरेशनचे अध्यक्ष अनास्कर यांनी निवेदन जारी केले आहे. त्यानुसार नागरी बॅंकिंग क्षेत्रात गेल्या आर्थिक वर्षात १८९ प्रकरणांमध्ये १२७ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यात कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात ९४ कोटींचा समावेश असून, तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही. उर्वरित प्रकरणांमध्ये सुमारे ३३ कोटी रुपये अडकल्याचे स्पष्ट होते. 

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या पहिल्या सहामाहीतच राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये झालेल्या घोटाळ्याची रक्‍कम सुमारे ९५ हजार कोटींच्या घरात गेली आहे. २०१७-१८ मध्ये ही रक्‍कम सुमारे ४१ हजार कोटी होती. त्यात केवळ दीड वर्षात ही रक्‍कम दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: civil banking sector issue