‘सिव्हिल इंजिनिअर्स’कडून सामाजिक कामांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या साथीने आम्ही विविध सामाजिक कामे हाती घेऊ, अशी ग्वाही असोसिएशन ऑफ लायसेन्स्ड सिव्हिल इंजिनिअर्सच्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ कार्यालयातील बैठकीत नुकतीच दिली.

असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष महेंद्र कर्नावट, सचिव संजय जुन्नरकर, रफिक खान, सुनील चिंचवडे, दयानंद शितोळे, प्रदीप पेठे, चेतन पेठे, संतोष टोणपे, कुंदन गोरे आदी या बैठकीस उपस्थित होते. 

मान्यताप्राप्त अभियंत्यांचे विविध प्रश्‍न या सदस्यांनी या वेळी मांडले तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी असोसिएशनची माहिती आणि संस्थेची भविष्यातील वाटचाल याबद्दलही सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. या भेटीमध्ये पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील विविध विकासकामे, नवीन प्रकल्पांबद्दल असोसिएशनच्या सदस्यांनी आपली मते नोंदवली.  

‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी ही बैठक बोलावण्यामागील उद्देश स्पष्ट केला, तर  वितरण विभागप्रमुख डॉ. सुनील लोंढे यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. सहयोगी संपादक सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: civil engineer social work guarantee sakal