मेलेल्या जनावरांच्या दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुणे ः येथील मुळा रस्ता सर्कलजवळ असलेल्या ओढ्यात अज्ञातांकडून मेलेली जनावरे टाकण्यात येत असल्यामुळे आठ मुळा रस्ता येथील वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून येथील रहिवाशांना घरात राहणे मुश्‍किल झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. 

येथील ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ओढा परिसराची स्वच्छता करावी यासंदर्भात शिवसेनेच्या शिवाजीनगर क्षेत्र समन्वयक महिला आघाडीच्या करुणा घाडगे यांच्यासह नागरिकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

येथील ओढ्यात नेहमीच मेलेली जनावरे टाकण्यात येतात. ओढ्याच्या लगत म्हशींचे गोठे आहेत. यातील गोठ्यांचे मालक ओढ्यात मेलेली जनावरे टाकत असल्याची शंका वस्तीतील रहिवाशांनी व्यक्त केली. तसेच परिसरातील अज्ञातांकडून कुत्री, मांजर, कोंबड्यासुद्धा मेल्यानंतर ओढ्यात टाकण्यात येतात. मेलेली जनावरे टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुळा रस्ता येथील महिला आघाडीच्या घाडगे यांच्यासह शारदा पाचारणे, नीलम पिल्ले, नूतन सातपुते, मंजू मारी, ललिता स्वामी, उषा शेलार आदींनी केली आहे. 
------------------------------------ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civilians suffer from dead animals