पुण्यात मध्यरात्री प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकास अटक 

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : प्रवाशास रेल्वे स्थानक परिसरात सोडण्याच्या बहाण्याने रिक्षामध्ये बसवून लष्कर परिसरात नेऊन मारहाण करीत जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 20 ऑगस्टला मध्यरात्री लष्कर परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

संतोष गुलाब नामदास (वय 34, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या एका साथीदारासही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कुमार सातपुते (वय 23, रा. सदाशिव पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातपुते यांना 20 ऑगस्टला मध्यरात्री दिड वाजता बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर परिसरातून जात होते. त्यावेळी संतोष नामदास हा त्याच्या रिक्षातून तेथून जात होता. त्याने फिर्यादी यांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात सोडतो, असे सांगितले. त्यावेळी रिक्षामध्ये आणखी एक व्यक्ती बसलेली होती. रिक्षाचालकाने त्याची रिक्षा लष्कर परिसरामध्ये निर्जनस्थळी नेली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करीत जबरदस्तीने त्यांच्याकडील साडे बाराशे रुपयांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करुन आरोपींना अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com