maha.jpg
maha.jpg

SSC Reults : दहावीचा निकाल तब्बल 12.31 टक्क्यांनी घसरला

पुणे, ता. 8 : विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाऱ्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदा पहिला निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी 77.10 टक्के म्हणजेच 12 लाख 47 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल हा गेल्या दहा-बारा वर्षांतील सर्वाधिक कमी निकाल आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या दहा-बारा वर्षांचा आढावा घेतला असता, निकालात दरवर्षी चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. परंतु ही चढ-उतार अवघ्या दोन ते तीन टक्‍क्‍यांपर्यंत होती. यापूर्वी 2006मध्ये 72.72 टक्के, तर 2007 मध्ये 78.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातुलनेतही यंदाचा निकाल हा कमी आहे. यंदा राज्यात कोकण विभागाचा 88.38टक्के असा सर्वाधिक, तर नागपूर विभागाचा 67.27 टक्के असा सर्वांत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीची परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती. या अभ्यासक्रमाप्रमाणे जवळपास 58 हजार 665 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 18 हजार 958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 32.32 टक्के इतकी आहे. 
खासगीरीत्या 30 हजार 861 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील 34.76 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनीचा निकाल 82. 82 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 72.18 टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 10.64 टक्‍क्‍यांनी जास्त आहे, अशी माहिती राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. 

2006 ते 2019 पर्यंतच्या निकालाची टक्केवारी (नियमित विद्यार्थी) 
वर्ष : निकालाची टक्केवारी 
2006 : 72.72 
2007 : 78.67 
2008 : 87.41 
2009 : 84.21 
2010 : 83.62 
2011 : 76.06 
2012 : 81.32 
2013 : 83.48 
2014 : 88.32 
2015 : 91.46 
2016 : 89.56 
2017 : 88.74 
2018 : 89.41 
2019 : 77.10 

दहावीच्या निकालातील वैशिष्ट्ये : 
- 100 टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या : 1,794 
- शून्य टक्के निकाल असलेल्या शाळा : 103 
- शून्य ते 10 टक्के निकाल असलेल्या शाळा : 209 
- 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी : 28, 516 
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल : 83.05 टक्के 
- राज्यात 20 मुलांना मिळाले 100 टक्के गुण : औरंगाबाद-3, अमरावती-1 आणि लातूर-16 

विभागनिहाय निकालाची टक्केवारी 
विभागीय मंडळ : टक्केवारी 
पुणे : 82.48 
नागपूर : 67.27 
औरंगाबाद : 75.20 
मुंबई : 77.04 
कोल्हापूर : 86.58 
अमरावती : 71.98 
नाशिक : 77.58 
लातूर : 72.87 
कोकण : 88.38 

कला, क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाइड क्षेत्रात सहभागी झालेल्या जवळपास एक लाख 36 हजार 979 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले. 
प्रकार : सवलतीचे गुण दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 
शास्त्रीय नृत्य : 1757 
गायन : 1466 
वादन : 1130 
लोककला : 4874 
नाट्यकला : 49 
चित्रकला : 1,11,975 
क्रीडा : 15,692 
एनसीसी : 2 
स्काऊट गाइड : 34 


"मराठी' विषयाच्या निकालात लक्षणीय घट 
मराठी प्रथम भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 12.54 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गेल्यावर्षी 90.96 टक्के विद्यार्थी मराठी विषयात उत्तीर्ण झाले होते, यंदा 78.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

भाषा आणि सामाजिक शास्त्र विषयांची 100 गुणांची लेखी परीक्षा, गणितासाठी 80 गुणांची लेखी आणि 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची भाग एक आणि भाग दोन अशी प्रत्येकी 40 गुणांची लेखी आणि 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे दहावीच्या परीक्षेचे स्वरूप होते. परंतु विषयनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. इंग्रजी ही द्वितीय किंवा तृतीय भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. तसेच गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. 

विषय : 2019 : 2018 
मराठी (प्रथम भाषा) : 78.42 : 90.96 
हिंदी (प्रथम भाषा) : 82.32 : 89.70 
इंग्रजी (प्रथम भाषा) : 90.99 : 97.86 
मराठी (द्वितीय/तृतीय भाषा) : 84.55 : 93.06 
इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा) : 80.24 : 90.12 
गणित : 89.90 : 89.13 
विज्ञान आणि तंत्रज्ञान : 92.15 : 94.37 
सामाजिक शास्त्र : 88.80 : 96.28 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com