शेकडो विद्यार्थ्यांनी अनुभवले सरोदचे सप्तसूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

‘सरोद’ वादनातून निघणारे सप्तसूर व शास्त्रीय संगीताचा मिलाप अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते ‘सकाळ सोशल फॉर ॲक्‍शन’, ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि  क्रिएटिव्ह आर्ट इन थेरपी यांच्यातर्फे आयोजित शास्त्रीय संगीत कार्यशाळांचे.

पिंपरी - ‘सरोद’ वादनातून निघणारे सप्तसूर व शास्त्रीय संगीताचा मिलाप अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते ‘सकाळ सोशल फॉर ॲक्‍शन’, ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि  क्रिएटिव्ह आर्ट इन थेरपी यांच्यातर्फे आयोजित शास्त्रीय संगीत कार्यशाळांचे.

प्राचीन भारतीय संगीताचा वारसा व त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रसिद्ध संगीतकार व मार्गदर्शक ध्रुपद मिस्त्री यांनी चिंचवडमधील गोदावरी हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य राधेशाम मिश्रा, उपप्राचार्य कुसूम तिवारी, पर्यवेक्षिका सुनीता मुखर्जी, राजकुमार माळी, ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष गदादे, पर्यवेक्षिका विद्या उदास, वर्षा जाधव, शीतल कापशीकर आदी उपस्थित होते. आपल्या प्राचीन शास्त्रीय संगीताचा वारसा जोपासण्याचे आवाहन करून मिस्त्री यांनी ‘सरोद’च्या माध्यमातून विविध रचना सादर केल्या. दिवाळीसुट्टीनंतर मिळालेल्या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यशाळेचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले.

संगीत कोणत्याही प्रकारचे असले, तरी ते सर्वांना आवडते. शास्त्रीय संगीताचा वारसा प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे पारंपरिक कला नव्या पिढीने नक्कीच जोपासली पाहिजे. देशात अनेक प्रकारचे संगीत ऐकायला मिळते. संगीतामुळे मनावरील ताणतणाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे संगीताची साधना नक्की केली पाहिजे. शास्त्रीय संगीताला प्राचीन वारसा असून, तो आपण जोपासला पाहिजे, असे मत प्रसिद्ध संगीतकार ध्रुपद मिस्त्री यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: classical music workshop