स्वच्छ आणि प्रसन्न ‘ससून’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

परिसरातून काढला १६ ट्रक कचरा आणि राडारोडा

पुणे - ससून रुग्णालयात लोकसहभागातून ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात नर्सिंग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ केला. या अभियानात प्रथमच दोन खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता सप्ताहात १६ ट्रक कचरा, राडारोडा उचलण्यात आला. 

‘ससून’मध्ये येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या मोठी आहे. सरकारी रुग्णालय असल्याने स्वच्छतेचे निकषही पाळणे अवघड होते, या परिस्थितीत ससून अभ्यागत मंडळाने ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ हे अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून सुरू केले. समितीचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभियानात ससूनचे कर्मचारी, विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, विविध सामाजिक संस्था-संघटना, धार्मिक संघटना आणि बीव्हीजी आणि सीएलआर या खासगी कंपन्या सहभागी झाल्या. या स्वच्छता सप्ताहात १६ ट्रक कचरा, राडारोडा उचलण्यात आला. याशिवाय, ससून रुग्णालय तसेच विविध होस्टेलमधील स्वच्छतागृह आणि बाथरूमची आधुनिक मशिनद्वारे स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने फुटलेली चेंबर, पाइप बदलण्यात आले. 

ससूनमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात येणार असून, त्यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेणार असल्याचे खासदार शिरोळे यांनी सांगितले. 

समारोपाच्या आजच्या दिवशी ‘ससून’चे विद्यार्थी वसतिगृह परिसर व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात मध्य रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी, सावित्रीबाई फुले विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी, निवासी डॉक्‍टर, अभ्यागत समितीचे सदस्य संभाजी पाटील, बागेश्री मंथाळकर, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. मनजित संत्रे आदी सहभागी झाले होते.

Web Title: clean & beautiful sasoon hospital area