#CleanPune नवीन वर्षात रस्ते चकाचक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - नवीन वर्षात तुमच्या भागातील रस्ता, घराभोवती एकही दिवस कचराच काय तर साधी धूळही दिसणार नाही. कारण, तुमच्या घराबाहेरील रस्ता ‘झिरो डस्ट’ असेल. तरीही कचरा आणि धूळ दिसली तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करू शकणार नाही. कारण, रस्त्याच्या साफसफाईची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे. मात्र, तुम्हाला तक्रार करण्यासाठी ठेकेदाराचा शोध घ्यावा लागणार आहे. संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासाठी महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साफसफाईचे अधिकार ठेकेदाराकडे दिले आहेत.

शहरातील १५ पैकी ९ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत यांत्रिकी पद्धतीने साफसफाई होणार असून, त्यासाठी नऊ वाहनांची व्यवस्था केली आहे. या योजनेसाठी दोन वर्षांत २० कोटींचा खर्च होऊनही ती उपयुक्त ठरली नसल्याचा शेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरीही, गेल्या काही दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर साफसफाईची योजना सुरू असल्याचे सांगून ती पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. योजनेचा खर्च, त्याच्या परिणामकारकतेबाबत मात्र पालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने हात झटकले आहे. तेव्हा यासंदर्भातील निविदा वाहन खात्याने काढल्याचे सांगत, काहीच माहिती नसल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरात महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या साफसफाईसाठी सुमारे साडेदहा हजार कामगार आहेत. त्यात महापालिकेचे सात हजार आणि ठेकेदारांकडील साडेतीन हजार कामगारांचा समावेश आहे. शहराची हद्द, कचऱ्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता एवढ्या कामगारांमध्ये साफसफाईची कामे होत नसल्याची तक्रार या विभागाचीच आहे. या पार्श्‍वभूमीवर यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा निर्णय झाला आहे.

शहरात सध्या कामगारांकडून होणाऱ्या स्वच्छतेच्या कामाचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून बहुतांशी भागात यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून साफसफाई करण्यात येणार आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका

Web Title: Clean Pune New year Clean Road