स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ अभियानांतर्गत शिरूर नगर परिषदेस पाचवा क्रमांक

नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते शिरूर नगर परिषदेस गौरविण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ अभियानांतर्गत शिरूर नगर परिषदेस पाचवा क्रमांक
स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ अभियानांतर्गत शिरूर नगर परिषदेस पाचवा क्रमांकsakal

पुणे (शिरूर) : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ या अभियानांतर्गत, घेतलेल्या स्पर्धेत शिरूर नगर परिषदेने एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटातून संपूर्ण देशांत नववा; तर पश्चिम भारतातील सहा राज्यांतील सहाशे नगर परिषदांतून पाचवा क्रमांक पटकावला.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान - २०२१ अंतर्गत कचरामुक्त शहर व थ्री स्टार मानांकन मिळाल्याबद्दल, नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते शिरूर नगर परिषदेस गौरविण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैशाली वाखारे व मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबरोबरच; उघड्यावरील हागणदारी मुक्तीबाबतचे विशेष मानांकनही नगर परिषदेला मिळाले आहे.

स्वच्छ भारत अभियान शहरात राबविण्याकरीता तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्याबरोबरच; नगर परिषदेमार्फत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावर शंभर टक्के कचरा प्रक्रिया करण्याचे नियोजन केले. यामध्ये शहरात दैनंदीन निर्माण होणा-या घनकच-याचे ओला व सुका कचरा विलगिकरण करणे, ओल्या कच-याचे कंपोस्ट खत तयार करणे, सुका कचरा पूनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठविणे अशा प्रकारची कामे नियोजनपूर्वक केली.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी होण्यासाठी नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वाखारे, तत्कालीन मुख्याधिकारी रोकडे, नगर परिषदेच्या स्वच्छता समितीचे सभापती विठ्ठल पवार, स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी व विशेषतः सफाई कामगारांनी विशेष योगदान दिले.

प्रकाश धारिवाल यांच्या कुशल नेतृत्वाखाली व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबविल्यानेच हा पुरस्कार प्राप्त होऊ शकला, असे नगरसेवक विजय दुगड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नगराध्यक्षा वाखारे, मुख्याधिकारी बोरकर यांच्यासह; सुरेखा शितोळे, संगिता मल्लाव, उज्ज्वला वारे, मनिषा कालेवार, ज्योती लोखंडे, सुनिता कुरंदळे, विठ्ठल पवार, मंगेश खांडरे हे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ अभियानांतर्गत शिरूर नगर परिषदेस पाचवा क्रमांक
'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील यशासाठी नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले असले; तरी या यशाचे खरे शिल्पकार शिरूरकर नागरीक आहेत. त्यांनी या अभियानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे अभियान सुरू झाल्यापासून नागरीकांनी शिस्तबद्धतेने सहयोग दिल्याने व नगर परिषदेच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळेच नगर परिषदेला हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे सर्व शिरूरकरांचा हा सन्मान आहे.

: वैशाली वाखारे, नगराध्यक्षा, शिरूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com