शिवाजीनगर परिसरात स्वच्छतेसाठी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

गोखलेनगर - गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येते. पुणे महापालिकेने या वर्षी देशात प्रथम तिसऱ्या क्रमांकावर येण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शिवाजीनगर-घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालयातर्फे शिवाजीनगर परिसर स्वच्छ राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. 

एफसी रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन, पुणे-मुंबई रस्ता, गणेशखिंड हे भाग स्वच्छ ठेवण्यासाठी शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातर्फे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या माहितीचा तपशील देणे, कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचरा विलगीकरण, क्रोनिक स्पॉट बंद करणे, प्रत्येक घरांमधून कचऱ्याचे संकलन करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करणे, सोसायट्यांमध्ये खत बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे, शाळा, महाविद्यालयांना सहभागी करून स्वच्छता अभियान राबवणे, स्वच्छतेची प्रतिज्ञा घेणे, व्यावसायिक भागात ओला कचरा व सुका कचऱ्याचे बिन्स बसवणे, पथनाट्य, कलापथकाद्वारे स्वच्छतेविषयी जागर करणे, भिंती रंगविणे, स्वच्छतेचे ॲप वापरण्यासाठी नागरिकांना सूचित करणे, ऑनलाईन तक्रारीचे २४ तासांत निवारण करणे आदी उपाययोजना राबविल्या जात आहे. वसती पातळीवर दिवसातून तीन वेळा शौचालये स्वच्छ केली जात आहेत.

घनकचरा व्यवस्थापनाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, तसेच किशोरी शिंदे, उमेश माळी, इनामदार आय. एस, एस. कांबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत. नागरिकांनी स्वच्छ पुणे सुंदर पुणे ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन इनामदार यांनी केले आहे.

Web Title: Cleaning Campaign in Shivajinagar