सात लाख ग्रामस्थांकडून श्रमदान

सुपे (ता. बारामती) - जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित स्वच्छता अभियानात प्लॅस्टिक कचरा जमा करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अन्य अधिकारी व कर्मचारी.
सुपे (ता. बारामती) - जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित स्वच्छता अभियानात प्लॅस्टिक कचरा जमा करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अन्य अधिकारी व कर्मचारी.

पुणे - स्वच्छ भारत (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित महास्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील सात लाख ग्रामस्थांनी श्रमदान करीत नवा उच्चांक केला. गावांमधून दोन टन प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात आला. शिवाय, २६० किलो प्लॅस्टिक जप्त करून त्यातून १५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. 

या मोहिमेत सर्व गावांमधील तीन हजार ६३२ शाळा, महाविद्यालये आणि या शैक्षणिक संस्थांमधील ९२ हजार ८१७ विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, २२ सामाजिक संस्थांनीही भाग घेतला. यामध्ये स्वच्छता रॅली काढणे, श्रमदान करून प्लॅस्टिक कचरा जमा करणे, वृक्षलागवड करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता करणे, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, कापडी आणि कागदी पिशव्यांचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच, उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आल्याचे या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी सांगितले.

या वेळी जिल्ह्यात तीन हजार ७३८ वृक्षांची लागवड करण्यात आली. पाच हजार २६७ कागदी आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वानुसार सात कंपन्यांनीही यामध्ये सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com