#PMCIssues सफाई कामगार वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पुणे - शहरात स्वच्छतेची कामे करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांच्या आरोग्याबाबत प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी, त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. पावसाळा सुरू झाल्याने उपाययोजना करण्याची त्यांची मागणी आहे. 

पुणे - शहरात स्वच्छतेची कामे करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांच्या आरोग्याबाबत प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी, त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. पावसाळा सुरू झाल्याने उपाययोजना करण्याची त्यांची मागणी आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये रोज साफसफाईची कामे करण्यासाठी या कामगारांची नेमणूक केली आहे. त्यात, कंत्राटी कामगारांचाही समावेश असून, रोज पहाटेपासून ते काम करीत असतात. कचरा उचलण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच असते. त्याकरिता त्यांना मास्क, हॅंडग्लोव्हज, साबण, बूट, रेनकोट आदी साहित्य पुरविणे बंधनकारक आहे. त्यावर खर्चही केला जातो. प्रत्यक्षात मात्र, कामगारांना ते मिळत नसल्याची तक्रार आहे. मोजक्‍याच वेळा साहित्य तेही अपुरे दिले जात असल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे एवढ्या प्रमाणात कामे करूनही आमच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे. 

त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील तीन-महिने कामगारांना वाईट परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. 

सफाई कामगार मीना शिंदे म्हणाल्या, ‘‘गेल्या ५ वर्षांपासून महापलिका सफाई कामगार म्हणून काम करत आहे. पालिका प्रशासनाकडून वेळेवर सुरक्षासाधने, मासिक वेतन मिळत नाही. आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. याचा प्रशासनाने विचार करवा, आमच्या कामाचा सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे.’’

सफाई कर्मचारी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देता निसर्ग व शहरातील सामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काम करतात. स्मार्ट सिटीत शहराचा समावेश होण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. तरीही त्यांच्या पाठीवर सन्मानाची थाप मिळत नाही, ही खेदाची बाब आहे.
- ॲड. सागर चरण, उपाध्यक्ष, आरोग्य विभाग तक्रार निवारण समिती

सफाई कामगारांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छतेकरिता विविध प्रकारचे साहित्य दिले जाते. त्यांच्या मागणीनुसार सुविधा पुरविण्यात येतात. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करून काळजी घेतली जाईल.
- सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग महापालिक

Web Title: cleaning employee issue