अत्याधुनिक यंत्राद्वारे सफाईला सुरवात

औंध - सफाई अभियानाला राजेंद्र जगताप, ज्ञानेश्‍वर मोळक, नगरसेवक विजय शेवाळे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सुनीता वाडेकर यांच्या उपस्थित सुरवात करण्यात आली.
औंध - सफाई अभियानाला राजेंद्र जगताप, ज्ञानेश्‍वर मोळक, नगरसेवक विजय शेवाळे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सुनीता वाडेकर यांच्या उपस्थित सुरवात करण्यात आली.

पुणे - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यांत्रिक पद्धतीने सफाईचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी नजीकचा बस थांबा येथे सुरू केला आहे. यामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा यांत्रिक वाहनाद्वारे रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. 

या प्रकल्पाचे उद्‌घाटन औंध- बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. हा प्रकल्प जर्मनीची एसटीआयएचएल कंपनी व उत्तर अमेरिकेतील चॅलेंजर कंपनी यांच्या सहयोगाने राबविण्यात येणार आहे. नगरसेवक विजय शेवाळे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सुनीता वाडेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, साहाय्यक आयुक्त संदीप कदम उपस्थित होते. 

बलवाडकर म्हणाले, ‘‘भविष्याच्या दृष्टिकोनातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.’’

हे साध्य होईल
    दुभाजक आणि पदपथासह रस्त्याची दररोज सफाई
    दुभाजकांचे प्रेशर वॉशिंग (दाबयुक्त सफाई)
    पदपथांचे प्रेशर वॉशिंग
    अतिक्रमित झाडांच्या फांद्यांची छटाई

स्वच्छतेच्या ठरलेल्या मानकापर्यंत पोचण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सहयोगाने प्रगत साधनांसह काम करत आहोत. भविष्यात पुणे हे स्वच्छ आणि स्मार्ट शहर नक्कीच बनेल.
- डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com