भाजपा चिंचवड विधानसभा यांच्या वतीने सांगवीत स्वच्छता मोहीम

रमेश मोरे
रविवार, 17 जून 2018

जुनी सांगवी : भाजपा चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी, वुई लव्ह फाऊंडेशन व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदान व परिसरात 'जागतिक स्वच्छता मोहीम-२०१८' अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुनी सांगवी येथील पिडब्ल्यूडी वसाहतीच्या मैदानात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात चिंचवड विधानसभेचे सर्व नगरसेवक, एक हजार स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे सव्वाशे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या (ह) प्रभाग प्रशासन अधिकारी आशा राऊत, आरोग्य अधिकारी व चिंचवड विधानसभा प्रभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, चिंचवड विधानसभा स्वच्छता अभियानासाठी प्रत्येकाने किमान १० कार्यकर्ते सोबत आणावेत , असे आवाहन श्री लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले होते. स्थानिक प्रभाग क्रं. ३२ मधील नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण राणे आदींनी या स्वच्छता मोहिमेचे संचलन केले. यावेळी स्वयंसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Web Title: Cleanliness campaign by the BJP on behalf of Chinchwad Vidhan Sabha