'द क्‍लिक्‍स'मध्ये प्राण्यांच्या भावमुद्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : आकाशात उंचावर स्वैरपणे उडणारे... झाडाच्या फांदीवर विसावलेले... पाण्यात मनसोक्त डुबकी मारणारे पक्षी, शिकार करणारा सिंह... एकमेकांशी भांडणारी हरणे... पिसारा फुलवलेला मोर... सोंडेद्वारे पाण्यात खेळण्याचा आनंद घेणारा हत्ती. वन्यप्राणी व पक्षी यांच्या अशा विविध भावमुद्रांचे अप्रतिम सादरीकरण रसिकांना पाहायला मिळत आहे. निमित्त आहे "द क्‍लिक्‍स' छायाचित्रे प्रदर्शनाचे.

धवलगिरी ऍडव्हेंचरर्सतर्फे राजा रवीवर्मा कलादालन येथे आयोजित प्रदर्शनाचे उद्‌घाटन आणि बक्षीस वितरण शनिवारी अभिनेत्री मधुरीमा तुली हिच्या हस्ते झाले. या वेळी वन्यजीव व प्राणी या प्रकारात मयूरेश हेंद्रे, देवेंद्र पोरे, प्रनील बोरकर यांना, फुले या प्रकारात सचिन शेखरे, लौकिक ठाकरे, अमित कुलकर्णी यांना, तर निसर्ग चित्रे प्रकारात आमोद जोशी, रुचिता शहा, फर्ग्युस मार्क यांना आणि किल्ले या प्रकारात वरुण परदेशी यांना सन्मानित करण्यात आले. धवलगिरी ऍडव्हेंचर्सचे प्रशांत ताले, स्वाती ताले, वन्यजीव छायाचित्रकार रोहन जागीरदार, सिनेमाटोग्राफर श्रीकांत तुली, विजया पंडित तुली हे उपस्थित होते.

छायाचित्रांबाबत जागीरदार म्हणाले, ""कोणतीही छायाचित्रे टिपताना त्यावर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. त्याची मूलतत्त्वे लक्षात घेऊन स्वतःच्या संकल्पनेचे त्यातून चांगल्याप्रकारे सादरीकरण होईल यावर भर दिला पाहिजे.''
प्रदर्शनात वन्यजीव आणि पक्षी यांच्या बरोबरच सह्याद्री आणि हिमालय पर्वतातील रमणीय भूप्रदेश, निसर्गछटा, विविध किल्ले तसेच रंगीबेरंगी फुलांचे मनमोहक छायाचित्रे पाहायला मिळतील.

Web Title: the clicks exhibition wildlife