तुमचे एटीएम कार्ड होतेय क्‍लोनिंग?

तुमचे एटीएम कार्ड होतेय क्‍लोनिंग?

पिंपरी -  बॅंकेच्या खात्यावरून पैसे चोरीस जाण्याच्या घटनेत सध्या वाढ झाली आहे. सायबर विभागाकडे आलेल्या तक्रारींमध्ये मासुळकर कॉलनी, लिंकरोड चिंचवड, वाकड आणि डांगे चौक या ठिकाणच्या एटीएममधून पैसे काढल्यावर कार्ड क्‍लोनिंग होत असल्याचे दिसून आले आहे.

समोरील व्यक्‍तीने आपल्याला फोन करून एटीएम कार्डाची माहिती आणि ओटीपी नंबर विचारला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. त्यामुळे तुमच्या खात्यावरून पैसे चोरीस जाण्याची शक्‍यता आहे. मात्र कोणताही फोन आला नाही आणि तुम्ही ओटीपी क्रमांकही दिला नाही आणि तरीही तुमच्या 

खात्यातील पैसे चोरीस गेले तर तुमचे कार्ड क्‍लोनिंग झाले असे समजायला हरकत नाही.

एटीएम मशिनमध्ये आपण ज्या ठिकाणी कार्ड टाकतो, त्या ठिकाणी क्‍लोनिंग मशिन लावली जाते. ही मशिन लावल्याचे अनेकदा समजूनही येत नाही. तसेच एका छोट्या छुप्या कॅमेराद्वारे तुमचा पासवर्ड चित्रीत केला जातो. चोरटे याच माहितीच्या आधारे नवीन एटीएम कार्ड तयार करून तुमचा पासवर्ड वापरून बॅंकेतील पैसे परस्पर काढतात.

सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले,  ‘‘शहरातील बहुतांश बॅंका एटीएमवर सुरक्षारक्षक नियुक्‍त करीत नाही. त्यामुळे चोरटे कार्ड क्‍लोनिंग करणारी मशिन आणि छुपा कॅमेरा लावतात. यावर उपाय म्हणून दिवसातून तीन ते चार वेळा बॅंकेने एटीएम 

तपासणे गरजेचे आहे. सीसी कॅमेरात क्‍लोनिंग मशिन लावणारे चोरटे किंवा पैसे काढणारी व्यक्‍ती दिसली तरी त्याचा उपयोग तपासात विशेष होत नाही.’’

बॅंकेत तक्रार करा
जर तुम्ही कोणालाही ओटीपी क्रमांक दिलेला नसला आणि तरीही बॅंकेतून पैसे परस्पर काढले गेले तर त्याची त्वरित बॅंकेत डिस्पूट फॉर्म भरून तक्रार करा. तसेच पोलिसांच्या सायबर विभागाकडेही लेखी तक्रार करा. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार तर खातेदाराची चूक नसल्यास त्यास ९० दिवसांच्या आत परत पैसे द्यावे लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com