Monsoon Mission : भविष्यात हवामानाचा अंदाज वर्तविणे होणार सोपे

आज वैज्ञानिक यासाठी ‘क्लाऊड फिजिक्स’चा अभ्यास करत आहेत. यामुळे भविष्यात हवामानाचा अंदाज वर्तविणे अधिक सोपे हाईल
pune
punesakal

पुणे : ‘‘नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यांच्या मागचे विज्ञान समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मॉन्सून दरम्यान हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी अनेक अडचणी येतात. जागतिक स्तरावर आज वैज्ञानिक यासाठी ‘क्लाऊड फिजिक्स’चा (Cloud Physics) अभ्यास आणि संशोधन करत आहेत. यामुळे भविष्यात हवामानाचा अंदाज (accurate weather Guess) वर्तविणे अधिक सोपे हाईल." असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग) सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी केले. (Cloud Physics is useful for accurate weather Guess)

भारतीय उष्णकटिबंधिय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीम), पृथ्वी विज्ञान मंत्रालय व ढग आणि ढग व पर्जन्य अभ्यासाची आंतरराष्ट्रीय समितीतर्फे (आयसीसीपी) १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्घाटन सोहळा ऑनलाइन पद्धतीने सोमवारी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा, आयआयटीमचे संचालक प्रा. रवी नंजूनदिया, राष्ट्रीय आयोजन समितीचे प्रा. जी. एस भट, आयसीसीपीच्या अध्यक्ष अँड्रीया फ्लॉसमॅन तसेच तर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

pune
अनलॉकची नवी नियमावली जाहीर; हॉटेल चालकांना दिलासा नाहीच!

प्रा. शर्मा म्हणाले, ‘‘पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने २०१२ मध्ये ‘मॉन्सून मिशन’ची सुरवात केली. यामुळे मॉन्सून अंदाज वर्तविण्याच्या प्रणालीत सुधारणा झाल्या आहेत. अतिवृष्टी, चक्रीवादळे अशा विविध आपत्त्यांबाबत पूर्व सूचना देण्यात येत आहेत. तर महाबळेश्‍वर येथील प्रयोगशाळा सध्या ढगांच्या निर्मितीची सातत्याने निरीक्षणे करत आहे.

तसेच मध्य भारतात भोपाळ येथे १०० एकर जागेत संशोधन केंद्र तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मॉन्सून प्रक्रियेतील घडामोडींवर आधारित संशोधन केले जातील. भारतात अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल.’’

pune
ENG vs IND बुमराहचा अनोखा अंदाज; पॅड बांधून केली बॉलिंग

डॉ. मोहपात्रा म्हणाले, ‘‘मॉन्सून मध्ये ढगांची निर्मिती ढगांची निर्मिती, मॉन्सूनचा प्रवास, पर्जन्य या सर्व गोष्टींचा अभ्यास सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोणातून महत्त्वाचा आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी ढगांच्या निर्मितीचा अभ्यास व निरिक्षण गरजेचे आहे. परंतु मेघ भौतिकशास्त्र समजणे आणि त्यासाठीचे मॉडेल तयार करणे कठीण आहे. मात्र या परिषदेच्या माध्यमातून ढगांच्या भौतिकशास्त्राचे अनेक पैलू उलगडण्यास मदत होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com