सत्तानाट्य चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी केली मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

पुणे - राज्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आपत्कालीन निधीतून पाच हजार 380 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विवटरव्दारे केली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला पाऊस न पडल्याने राज्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाने होरपळून गेला होता. त्यानंतर पावसाळ्याच्या अखरेच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर या दोन महिन्यात मात्र राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. त्यातून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय पूरस्थितीने पिके वाहून गेली. राज्यातील अनेक भागात अक्षरक्षः ओला दुष्काळ पडला होता. यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे.

भाजपचं ठरलं! ...तरच विश्‍वासदर्शक ठराव मांडणार

दरम्यानच्या काळात, राज्यात सरकार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी पिकांसाठी प्रतिहेक्‍टरी आठ हजार रुपये तर, फळबागांसाठी प्रतिहेक्‍टरी 18 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी (ता.23) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज (ता.25) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM announces big announcement for farmers