मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'साठी पुण्यात झाडांची कत्तल!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा पुण्यात प्रवेश करणार आहे. हडपसर, स्वारगेट, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नळ स्टॉप, शिवाजीनगर या मार्गे वडगाव शेरी येथे पहिला टप्प्पा संपणार आहे.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला.

- आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत

शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा पुण्यात प्रवेश करणार आहे. हडपसर, स्वारगेट, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नळ स्टॉप, शिवाजीनगर या मार्गे वडगाव शेरी येथे पहिला टप्प्पा संपणार आहे. तर रविवारी (ता. 15) सकाळी दहा पासून दांडेकर पुलापासून सिंहगड रस्त्यावरून दुसरा टप्पा आहे.

पुणे शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्या मोठी आहे, पण मुख्यमंत्र्याचा रथ हा उंच असल्याने त्यास झाडांच्या फांद्यांचा अडथळा येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी छाटणी करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले. सिंहगड रस्त्यावर गणेश मळा ते राजाराम पुल, सेनादत्त पोलिस चौकी ते म्हात्रे पुल या दरम्याच्या झाडाच्या फांद्या छाटायच्या सोडून बुडापासून काही उंचीवरून रस्त्याच्या बाजूने असलेल्या मोठमोठ्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. काही झाडे तर अर्ध्यापेक्षा जास्त तोडण्यात आली आहेत. हा सर्व प्रकार पाहून नागिरकांनाही धक्का बसला. खासदार वंदना चव्हाण यांनीही फेसबुकवर वृक्षतोडीचे फोटो टाकून हा प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे.

- साताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी उतरवणार तगडा उमेदवार!

स्थानिक नागरिक गजाजन लोंढे म्हणाले, एकीकडे सरकार झाडे लावा म्हणत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसाठी गणेश मळा ते राजाराम पुल या दरम्यानची झाडे तोडली आहेत. ही चुकीचे आहे.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष तांदळे यांनी आम्ही दरवर्षी प्रमाणे यंदाही फांद्या तोडल्या आहेत. यात चुकीचे काही नाही असा दावा केला. मात्र, त्यांना फांद्या तोडल्या नाहीत, तर झाडे कापले आहेत असे सांगितल्यावर मी जागेवर जाऊन पाहणी करतो, असे मान्य केले.

पावसाळ्यात केले दुर्लक्ष
पावसाळ्यात अनेक झाडांच्या फांद्या पडून मोठे नुकसान झाले होते, तेव्हा प्रशासनाला जाग आली नव्हती. आता मुख्यमंत्री येणार म्हणून झाडांच्या फांद्या छाटायच्या नावाखाली बेसुमार तोड केली आहे.

- Video : राष्ट्रवादीत 15 वर्षांत फक्त अडवा आणि जिरवा : उदयनराजे

Image may contain: one or more people, tree and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM coming to Pune city for the Mahajanadesh Yatra the trees along the road are being cut down