Vidhan Sabha 2019 : आ. तापकीर यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हिताशी त्यांची असलेली बांधिलकी निश्चितच प्रशंसनीय आहे. असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भीमराव तापकीर यांना पाठविले.

खडकवासला (पुणे) : आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हिताशी त्यांची असलेली बांधिलकी निश्चितच प्रशंसनीय आहे. असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भीमराव तापकीर यांना पाठविले. 

राज्यात गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत विविध आघाड्यांवर सुरू झालेली परिवर्तनाची प्रक्रिया, नवमहाराष्ट्राची पायाभरणी करणारी ठरली आहे. त्यासोबतच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीही सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनांच्या यशस्वीतेत स्थानिक लोकप्रतिनिधींचे मोलाचे योगदान लाभले असून त्यात आ. तापकीर यांचा अग्रक्रमाने समावेश आहे, असे उल्लेख या पत्रात केला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (ए), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयतक्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार भिमराव तापकीर यांनी बालाजीनगर, राजीव गांधीनगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला आहे. यावेळी, दिगंबर डवरी, अरुण राजवाडे, नगरसेविका राणी भोसले, वर्षा तापकीर, सचिन थोपटे, रामदास भोसले, जितू कोंढरे, अशोक कोंडे  स्वप्नील पवार, अमित शिवंणगे, अमित तारू, संभाजी भोसले, प्रविण निगडे, कोठाजी भोंडवे, महेश हंगेरीकर, राजेंद्र धुमाळ, तर सनसिटी आनंदनगर मधील पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सिंहगड रस्त्यावरील नगरसेवकासह शिवसेनेचे भरत कुंभारकर, राजू चव्हाण, वैभव हनमघर, समीर रूपदे यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm Devendra Fadanvis Appreciate MLA Bhimrao Tapkir