Pune Wall Collapse : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

कोंढव्यात मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत 16 जणांच्या मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेबाबात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे : कोंढव्यात मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत 16 जणांच्या मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेबाबात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

''कोंढव्यात झालेल्या दुर्घटनेबाबत समजल्यावर अत्यंत वाईट वाटले. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून जखमी झालेले लवकर बरे होवोत अशी प्राथर्ना मी करतो. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सखोल चौकशीचे आदेश दिले आहे,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. 

कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीच्या कंपाऊंडची भिंत कोसळून १२ जण ठार झाले. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही भिंत मोठी होती आणि कामगारांची घरे खड्ड्यात होती. या घटनेबाबत राज्यमंत्री विजय शिवतारे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadanvis directs in depth enquiry for Kondhawa Accident