मुख्यमंत्री येणार पवारांच्या बालेकिल्ल्यात; घेणार सभा

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

बारामती शहर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष विमानाने दिल्लीहून दुपारी एकपर्यंत शिर्डी विमानतळावर येणार आहेत. एक वाजून पाच मिनिटांनी शिर्डीवरुन काष्टीकडे ते हेलिकॉप्टरने प्रयाण करणार असून, एक वाजून 40 मिनिटांनी काष्टी येथे येऊन ते सभेला संबोधित करतील. त्या नंतर दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी काष्टीहून हेलिकॉप्टरने ते थेट इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे येणार आहेत. 

भिगवणहून त्यांची रथयात्रा शेटफळगडे, बारामती एमआयडीसी, पेन्सिल चौकमार्गे बारामतीतील तीन हत्ती चौकात येणार आहे. तीन हत्ती चौकातील सभेला संबोधित करुन दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बारामतीहून वरवंडला जाणार आहेत. 

वरवंड येथील जाहिर सभा करुन ते रथयात्रेद्वारे पुणे शहरात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी दिली. उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशामुळे दिल्ली येथे मुख्यमंत्र्यांना जावे लागल्याने आजच्या कार्यक्रमात अचानक बदल करावा लागल्याचे गावडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com