लक्षात ठेवा, फ्लेक्स लावून तिकीट मिळणार नाही: मुख्यमंत्री 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

पुणे : पुणे शहरात इच्छूकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मि़ळेल, फलक लावणारयांविरोधात कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली आहे. आज (रविवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात यात्रेमुळे झालेल्या वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांची गैरसोय झाली त्याबद्दल दिलिगरी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजीबाबतही वक्तव्य करत इच्छुकांना एकप्रकारे इशाराच दिला. पुण्यातील अनेक प्रकल्पांविषयीही त्यांनी वक्तव्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ''या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. सामान्य माणूस भाजपच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करत आहे. यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळतो आहे. सरकारांचया कामाबाबत लोकांत समाधान आहे. म्हणूनच लोकांचे समर्थन मिळत आहे. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळेल. शहरातील रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. त्याचे परिणाम दिसत आहेत. देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि रोज़गार उपलब्ध झाले आहेत. रोज़गारही सर्वाधिक मिळाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचा मोठा फायदा झाला. पश्चिम महाराष्ट्रातील बंद प्रकल्प सुरू झाले. या भागातील जुन्या सरकारमद्ये खूप मंत्री होते; पण त्यांनी काहीच केले नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com