मुख्यमंत्र्यांना पुण्याचा  विकास नकोय : चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पुणे : "राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल आकस आहे. पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्राचा बराच विकास झाला असून, आता तो थांबवायला हवा, असेच त्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे त्यांची कृतीही दिसते,'' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी भाजपवर टीकेची तोफ डागली. 
कसबा व सोमवार पेठ भागातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, रोहित टिळक आदी या वेळी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, ""पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक शहर आहे. याचा समतोल विकास करण्याची शक्ती भाजप, शिवसेनेकडे नाही. ती दृष्टी फक्त कॉंग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योग, व्यावसाय नागपूरला घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांना मतदान का करायचे, याचा विचार करा.'' 
नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेच; पण तरुणही बेरोजगार झाले आहेत. याकडे लक्ष वेधून चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ""दोन कोटी लोकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र फक्त दोन लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या. 40 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग विकासाची गती मंदावली. काही उद्योग बंद पडले. त्यामुळे पंतप्रधानांचा नोटीबंदीचा निर्णय हा मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी होता. या निर्णयाने मात्र सामान्यांना दोन हजार रुपयांसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले.'' 
""नोटाबंदीच्या निर्णयाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपला भरभरून मदत केली. पोत्यांनी मते टाकली. तीच व्यापारी मंडळी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आतुर झाली आहेत,'' असेही ते म्हणाले. 

Web Title: CM dont want to development : prithviraj chavan