संभाजीनगरमधील वाद हाताळण्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समर्थ; नारायण राणे

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला भारतीय जनता पक्षाकडून ‘सावरकर सन्मान रॅली’ आणि महाविकास आघाडीची पहिली ‘वज्रमूठ सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
CM eknath shinde devendra fadanvis able to handle dispute Sambhajinagar Narayan Rane politics
CM eknath shinde devendra fadanvis able to handle dispute Sambhajinagar Narayan Rane politicssakal

पुणे : भारतीय जनता पक्षाकडून आयोजित ‘सावरकर सन्मान रॅली’ आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या ‘वज्रमूठ सभे’ मुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतीही वाद किंवा काही परिस्थिती निर्माण झाली तर ती सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समर्थ आहेत, असा विश्‍वास केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला भारतीय जनता पक्षाकडून ‘सावरकर सन्मान रॅली’ आणि महाविकास आघाडीची पहिली ‘वज्रमूठ सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आपली भूमिका काय आहे, असे विचारले असता राणे यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. राणे म्हणाले, रॅली आणि सभेबद्दल मी माझे मत ऐकणाऱ्यांना सांगू शकतो. मात्र न ऐकणाऱ्यांना काहीच सांगू शकत नाही. ठाकरे हे संपले आहेत. त्यांचे काही राहिले नाही. केवळ मातोश्री शिल्लक आहे. तर उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे नाही तर केवळ मातोश्रीचे मुख्यमंत्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com