‘महाजनादेश यात्रे’त मुख्यमंत्र्यांची पुणेकरांना साद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

सरकारने पाच वर्षांत जी कामे केली, ती जनतेच्या दरबारात मांडून पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळवायचा आहे. सांगा मला तुमचा आशीर्वाद आहे का?’’ अशी साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालताच समोरून टाळ्यांच्या कडकडाटात ‘हो’ असा प्रतिसाद आला.

पुणे - ‘‘सरकारने पाच वर्षांत जी कामे केली, ती जनतेच्या दरबारात मांडून पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळवायचा आहे. सांगा मला तुमचा आशीर्वाद आहे का?’’ अशी साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालताच समोरून टाळ्यांच्या कडकडाटात ‘हो’ असा प्रतिसाद आला. आवाज येताच ‘तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून पुन्हा विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवणार,’ असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ने शनिवारी हडपसर येथे पुण्यात प्रवेश केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जी कामे केली ती जनतेच्या दरबारात मांडून आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी जनतेच्या सेवेत यायचे आहे. तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून मी मुंबईला जातो. विधानसभेवर महायुतीचा झेंडा लावतो आणि पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी येतो.’’ 

  मुख्यमंत्री म्हणाले...
भिगवण - आघाडी सरकारने १५ वर्षांत केलेल्या कामांपेक्षा अधिक कामे युती सरकारने गेल्या पाच वर्षांत केली आहेत. जनतेचा कौल आमच्या पाठीशी आहे. 
बारामती - ३७० कलम रद्द करण्याच्या बाजूने राष्ट्रवादीने मतदान केले नाही. कोणीही त्यांच्या पक्षात राहण्यास तयार नाही. ‘बुरे काम बुरा नतीजा, सुन भाई चाचा-भतीजा.’ 
वरवंड - गेली १५ वर्षे ईव्हीएम मशिनवर मतदान झाले. मग आता मशिनच्या नावाने का ओरडता? बिघाड मशिनमध्ये नाही, तर तुमच्या खोपडीत झाला आहे. 
उरुळी कांचन - राज्य सरकारची कामगिरी दमदार आहे. जनतेने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला आशीर्वाद द्यावा.

जिल्ह्यातील यात्रेचा प्रवास 
 नगरहून भिगवणला पुणे जिल्ह्यात
 बारामती
 वरवंड
 उरुळी कांचन 
 हडपसर ते वडगाव शेरी दरम्यान पुण्यातील सात विधानसभा मतदारसंघांतून यात्रा
 पुण्यात मुक्काम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM mahajanadesh yatra in pune