कृषी ज्ञान-तंत्रज्ञानाचा हा यज्ञ, शेतकऱ्यांनो फायदा घ्या : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

बारामती : कृषी विज्ञान केंद्राने खास तुमच्यासाठी कृषी ज्ञान-तंत्रज्ञानाचा हा यज्ञ भरवला आहे. अतिशय चांगले प्रदर्शन आहे. नवनविन तंत्रज्ञान पाहा. आत्मसात करा. कंपन्यांनी अवजारे तयार केली आहेत. ती फक्त पाहू नका, त्यात सुधारणा आवश्यक असतील तर सूचना करा. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचे सर्वात मोठे आकर्षण बनले आहे. प्रदर्शनाचा फायदा घ्या, असे आवाहन एका शेतकरी गटाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बारामती अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित 'कृषिक 2020'चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमीर खान, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बँका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, प्रक्रिया उद्योग, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञानातील कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ, अतिवृष्टीशी बळिराजा जिद्दीने लढतो आहे. या लढाईत साथ देण्यासाठी कृषिक 2020 कडून बारामतीत भरविल्या जात असलेल्या कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे आहे. 19 जानेवारीपर्यंच चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com