‘सीएनजी’ मोजणाऱ्या यंत्रांचा अभाव

दिलीप कुऱ्हाडे 
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

येरवडा - ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनधारकांना किती इंधन भरले, याची तपासणी करता येत नाही. वैधमापनशास्त्र विभागाकडे ‘सीएनजी’ मोजण्याचे पुणे जिल्ह्यासाठी एकमेव ‘प्रोव्हर किट’ उपलब्ध आहे. मात्र, ते हाताळण्याचे कौशल्य या विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक सीएनजीवर चालणाऱ्या वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

येरवडा - ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनधारकांना किती इंधन भरले, याची तपासणी करता येत नाही. वैधमापनशास्त्र विभागाकडे ‘सीएनजी’ मोजण्याचे पुणे जिल्ह्यासाठी एकमेव ‘प्रोव्हर किट’ उपलब्ध आहे. मात्र, ते हाताळण्याचे कौशल्य या विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक सीएनजीवर चालणाऱ्या वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

कोणतेही इंधन किंवा वस्तू अचूक मापात देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मापात तर पाप झाले, तर उत्पादकावर किंवा वितरकारवर दंडात्मक 
कारवाई होऊ शकते. मात्र, शहरात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यात रिक्षा, कॅबची संख्या जास्त आहे. या चालकांना ‘सीएनजी’ भरल्यानंतर ते अचूक आहे की नाही, याची शाश्‍वती देता येत नाही. शहरात ४९ सीएनजी पंप, तर ७५ नोझल्स आहेत. मात्र या नोझल्सवर सीएनजी भरताना त्याची घनता, दाब आणि वजन यामध्ये तांत्रिक तफावत असल्याची तक्रार अनेक रिक्षाचालक संघटनांकडून होत आहे.

वैधमापनशास्त्र विभागाकडे ‘सीएनजी’ पंपाची तपासणी व पडताळी करण्यासाठी ‘प्रोव्हर किट’ आहे. हे किट वाहनात भरलेले सीएनजी योग्य वजनात दिले का, याचीसुद्धा पडताळणी करते. मात्र, जिल्ह्यासाठी एकच किट आहे. हे किट गेल्याची आठवड्यात केरळ येथील पलकड येथून तपासणी व पडताळी (कॅलिब्रेशन) करून आणल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाच्या उपनियंत्रक सीमा बैस यांनी दिली.

शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅसचे वितरण होते. शहर व जिल्ह्यात सीएनजी पंप आहेत. त्यापैकी नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर, मुंढवा येथील गायकवाड, लोणकर, तर पौड रस्त्यावरील साई सायाजी सीएनजी पंपाची पडताळणी व तपासणी केली आहे. यामध्ये दोन टक्के फरक पडल्याचे दिसून येते. मात्र, ते नियमात आहे.
- सीमा बैस, उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग, पुणे 

शहरात अनेक सीएनजी पंप आहेत. सीएनजीची इंधन क्षमता व घनता तपासणीची पुरशी यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यामुळे सूरत हजीऱ्यांहून येणारा सीएनजी व बॉम्बे हाय येथून येणाऱ्या सीएनजीच्या घनतेत फरक पडतो. याचे समाधानकारक उत्तर मात्र वैधमापनशास्त्र विभागाकडे नाही.
- श्रीकांत आचार्य, सल्लागार, आम आदमी रिक्षाचालक संघटना

Web Title: CNG Counting Machine