आलिशान मोटारींनाही सीएनजी किट

संदीप घिसे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पिंपरी - गेल्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली. यामुळे बजेटही वाढले आहे. त्यामुळे काही वाहनमालकांनी सीएनजीचा पर्याय निवडला आहे. आता तर आलिशान मोटारींनाही सीएनजी कीट बसविणाऱ्याची संख्या वाढत आहे. वाढत्या इंधनदराचा फटका श्रीमंतांनाही बसू लागला आहे. 

पिंपरी - गेल्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली. यामुळे बजेटही वाढले आहे. त्यामुळे काही वाहनमालकांनी सीएनजीचा पर्याय निवडला आहे. आता तर आलिशान मोटारींनाही सीएनजी कीट बसविणाऱ्याची संख्या वाढत आहे. वाढत्या इंधनदराचा फटका श्रीमंतांनाही बसू लागला आहे. 

सीएनजीवरील रिक्षा, मोटारी, बस आणि दुचाकीही धावतात. यामुळे पुणे, मुंबईप्रमाणे सीएनजीच्या पंपांची संख्या वाढत चालली आहे. सीएनजी स्वस्त असून प्रदूषणही कमी होण्यास मोटा हातभार लागतो आहे. इंधनदरवाढीचा फटका आता श्रीमंतांनाही बसत आहे. या मुळे फॉच्युनर, होंडा सिटी, इनोव्हा यांसारख्या आलिशान मोटारीनांही सीएनजीवर किट बसविण्याचे प्रमाण वाढत आहे.  इलेक्‍ट्रिक वाहने हा नवीन पर्याय बाजारात उपलब्ध आहे. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. 

पेट्रोलवरील अलिशान मोटारीसाठी सात ते आठ रुपये, तर डिझेलवरील मोटारींसाठी सहा ते सात रुपये प्रति किलोमीटरला पडतात. तर सीएनजी किट असलेल्या वाहनांना साडेतीन ते चार रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. म्हणजेच पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीसाठी निम्माच खर्च येतो. बाजारात सीएनजी किट बसविण्यासाठी ४० हजारांपासून ते ६६ हजारांपर्यंत खर्च येतो. इंधन खर्चातील बचतीमुळे अवघ्या चार वर्षांत सीएनजी किटचा खर्च वसूल होतो. बाजारात येणाऱ्या वाहनांपैकी ४० टक्‍के प्रमाण हे सीएनजीवरील वाहनांचे आहे. सध्या सीएनजी पंपांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. मात्र सीएनजी पंपांची संख्या वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

 पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त पर्याय 
 चार वर्षांत सीएनजी किटचे पैसे वसूल 
 सीएनजी पंप वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू 
 सीएनजीमुळे प्रदूषण नाही
 बाजारातील ४० टक्‍के वाहनांना असतो सीएनजी किट

सीएनजीवरील वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण शून्य टक्‍के असून, ती काळाची गरज आहे. यामुळे सीएनजीवरील वाहनांचा वापर नागरिकांनी करावा. 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

एका दिवसात सीएनजीचे किट मोटारीला बसवून मिळते. यामुळे इंधन खर्चात ५० ते ६० टक्‍के बचत होते. वाढत्या इंधनदरामुळे आलिशान मोटारींनाही सीएनजी किट बसविण्याकडे मालकांचा कल आहे. 
- रोहन यादव, गॅरेज मालक 

Web Title: CNG Kit in Luxury cars