
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या रिक्षा संघटनांनी रिक्षा दरवाढीची केलेली मागणी मान्य होण्याची शक्यता अधिक आहे.
'सीएनजी' मुळे पुण्यात रिक्षाचा प्रवास महागणार?
पुणे - सीएनजीच्या वाढत्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या रिक्षा संघटनांनी रिक्षा दरवाढीची केलेली मागणी मान्य होण्याची शक्यता अधिक आहे. खटवा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार २५ टक्के इंधन दरवाढ झाल्यास रिक्षा दरवाढ केली जाते. सीएनजी मध्ये मात्र सुमारे ६५ टक्के दरवाढ झाले असल्याचा दाखला रिक्षा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक होणार असून, यात किमान दोन रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.मात्र दरवाढ करताना प्रवासी रिक्षा पासून दुरावण्याची भीती देखील रिक्षा संघटनांना आहे.
पुण्यातील रिक्षा सीएनजीवर धावतात. गेल्या काही महिन्यात पंचावन्न-साठ रुपयांवरून सीएनजीचे दर ८२ रुपये झाले. त्या तुलनेत रिक्षांचे दर वाढले नाही.सध्याच्या प्रचलित दरानुसार दर आकारले जात आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे रिक्षा संघटनेचे म्हणणे आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये आत्ताचे रिक्षा भाडे दर निश्चित केले गेले. मात्र या सात महिन्यांत सीएनजी मध्ये ६५ टक्के दरवाढ झाली.
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे रिक्षा भाडेवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नाही. आरटीएच्या बैठकीत यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे-पिंपरी चिंचवड
Web Title: Cng Make Rickshaw Travel More Expensive In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..