Indapur News : इंदापुरमध्ये सीएनजी पंप पाच दिवसापासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cng pump Closed

Indapur News : इंदापुरमध्ये सीएनजी पंप पाच दिवसापासून बंद

इंदापूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकांनी सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांना पसंती दिली असली तरी मात्र आता सीएनजी भरणे वाहनधारकांसाठी गैरसोयीचे होत आहे. इंदापूर येथील दोन्ही सीएनजी पंप गेली चार दिवसापासून बंद असल्याने इंदापूरसह पुणे आणि सोलापूर येथून येणाऱ्या वाहनधारकांनी गैरसोय होत आहे.यामुळे ‘गॅसवरचे वाहन नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

इंदापूर शहरामध्ये एक व पुणे सोलापूर महामार्गावर सरडेवाडी गावच्या हद्दीत एक असे दोन सीएनजी पंप आहे. पुणे आणि सोलापूर या शहरातून निघणाऱ्या सीएनजी धारक वाहन चालकांसाठी हे पंप अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे यामुळे या पंपावर वाहनांची सतत वर्दळ असते.परंतु गेल्या चार दिवसांपासून दोन्ही सीएनजी पंप बंद आहेत.यांचा मानसिक तसेच आर्थिक फटका वाहनधारकांना नाहक सोसावा लागत आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

1 ) कंपनीच्या नियम व अटींमुळे बंद..

कंपनीने अनेक नियम व अटींमुळे तसेच पंप चालवण्यासाठी परवडत नसल्यामुळे बंद केला आहे.

- राहुल बाळासाहेब व्यवहारे (सी.एन.जी.पंप मालक,इंदापूर)

2) पंप तांत्रिक अडचणीमुळे बंद.

काही तांत्रिक अडचणीमुळे पंप बंद आहे. याबाबत आमच्याकडुन प्रयत्न सुरू आहेत. तरी 10 पर्यंत पंप सुरू होईल.

- निखिल बाब्रस (सी.एन.जी.पंप मालक इंदापूर)

तात्काळ उपाययोजना करण्याची गरज

इंदापूर हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती शहर आहे तसेच या भागातही सीएनजी वाहनधारकांची संख्या मोठी आहे.यामध्ये काही वाहने ही फक्त सी एन.जी वरच आहेत.ती गेली पाच दिवस झाले जाग्यावरच उभी आहेत.जर पंप बंद राहिले तर मोठे नुकसान होत आहे.यामुळे यावर तोडगा काढावा.

- रवींद्र परबत - वाहन धारक इंदापूर

आर्थिक बाबीमुळे पुरवठा बंद..

याबाबत सी एन जी कंपनीचे मुख्य वितरक यांच्या व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधला असता इंडियन ऑईल व टोरोंटो गॅस यांच्यामध्ये करार आहे.त्यानुरूप सीएनजी पुरवठा केला जातो. आम्हाला इंडियन ऑईल कडून मेलद्वरे संबंधित पंप यांचेकडून आर्थिकबाबत पूर्तता न केल्याने पुरवठा थांबविण्याबाबत कळविण्यात आल्याने पुरवठा बंद केला आहे. अशी माहिती दिली.